सातबारा अन् नकाशांमधील तफावत दूर होणार, शहादा तालुक्यातील ५ गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवड

---Advertisement---

 

नंदुरबार : राज्यातील जमिनींचे नकाशे आणि ७/१२ उतारा यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘विशेष सहाय्य योजना २०२४-२५’ अंतर्गत एक म हत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. त्यात नाशिक विभागातून पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी विजय सवडदकर यांनी दिली. शहादा तालुक्यातील निवड झालेली गावे यात शहादा तालुक्यातील दरा, तलावडी, रामपूर, फत्तेपूर व विरपूर या पाच गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ‘पोटहिस्सा मोजणी’चे काम केले जाणार आहे.

राज्यात सन १९९२ पासून एकत्रिकरण योजनेस स्थगिती देण्यात आली आहे. तेव्हापासून डिसेंबर २०२४ पर्यंत कौटुंबिक वाटणी, खरेदी-विक्री, वारस नोंद अशा विविध व्यवहारांमुळे सुमारे २ कोटी १२ लाख नवीन ७/१२ (अधिकार अभिलेख) तयार झाले आहेत. मात्र, या सर्व नवीन ७/१२ प्रमाणे प्रत्यक्ष पोटहिस्सा मोजणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नकाशे अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे या जमि नीच्या सीमा व खुणांच्या नोंदींबाबत ७/१२ आणि नकाशात मोठी तफावत निर्माण झाली होती.

जमीनीचे व्यवहार पारदर्शक होतील

शेतजमीनीचे ७/१२ उतारा आणि प्रत्यक्ष नकाशा यातील विसंगती दूर झाल्यामुळे जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक होतील. तसेच मूळ ७/१२ क्षेत्राप्रमाणे प्रत्यक्ष मोजणी होऊन नवीन अद्ययावत नकाशे तयार केले जाणार आहेत. त्यानुसार अद्ययावत नकाशे होणार आहेत.

वाद मिटण्यास मदत होणार

शेतशिवारात बऱ्याच ठिकाणी शेतबांधांवरील वाद असून या पोटहिस्सा मोजणीमुळे शेतकऱ्यांचे अंतर्गत वाद कमी होण्यास मदत होईल. तसेच हद्दी आणि खुणांच्या स्पष्ट नोंदींमुळे भविष्यातील जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे

अभिलेख अद्यावतीकरण प्रगतीपथावर

अभिलेख अद्ययावतीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. संपूर्ण राज्यातून एकूण १८ तालुक्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली असून, त्यामध्ये शहादा तालुक्याचा समावेश असल्याचे जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी सवडदकर यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---