मुंबई : सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणावरुन वातावरण तापले. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता याप्रकरणावरुन ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दिशा सालियानची हत्या झाल्याचा आरोप करत न्यायालयात या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. तसेच तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गुरुवार, २७ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “दिशा सालियानप्रकरणाशी माझा संबंध नाही. या विषयाबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे त्या विषयावर मी बोलत नाही,” असे म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
व्हाट्सऍप्स ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी व्हाट्सऍप्स चॅनलला फॉलो करा