अडावद : येथील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मानव विकास योजने अंतर्गत आठवीच्या विद्यार्थिनींचे नावे मगविण्यात आली होती. त्या अनुषंगाने 49 विद्यार्थिनींच्या मोफत सायकल शासनाने पाठविल्या होत्या. त्यानुसार सर्व विधार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या.
याबाबत अधिक वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मानव विकास योजनेतून अँग्लो उर्दू हायस्कुल मधील 49 विध्यार्थिनींना सायकली मंजूर झाल्या होत्या. त्या सायकलींचे शनिवार, 13 रोजी संस्था अध्यक्ष हाजी कबीरोद्दीन दिलफरोज, सचिव इम्रानखा अय्युबखा, उपाध्यक्ष ताहेर शेख इकबाल व सर्व संस्था चालकांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप केल्या.
यावेळी मुफ्ती अर्षद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अँग्लो उर्दू शाळा संस्थेचे अध्यक्ष हाजी कबीरोद्दीन शेख, सचिव इम्रान खा, उपाध्यक्ष ताहेर शेख, सईद खान, गोहरअली काजी, अब्दुल कादर शेख, हबीबोद्दीन शेख, हाजी फजल शेख, जुनेद खान, रउफ कुरेशी, जहीर शेख, बबनखा तडवी, सईद मिस्तरी, रज्जाक शेख व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद मेहमूद, शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.