Pachora News : जिल्हाधिकाऱ्यांची पाचोरा येथे भेट ; निवडणूक तयारीचा घेतला आढावा

पाचोरा (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे प्रशासन देखील तयारीला लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील विधान सभा निवडणूक जाहीर करताच विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर प्रशासनाकडून देखील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विधान सभा निवडणुक लक्षात घेऊन पाचोरा शुक्रवार १८ रोजी भेट येथे दिली. या भेटीत त्यांनी निवडणूक संदर्भांत करण्यात येत असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेले आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष व मतदार सुविधा कक्षाची पाहणी केली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित नोडल अधिकारी व त्यांचे सहायक यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच MAIDC गोडावुन, गिरड रोड पाचोरा येथील Strong Room. Training Center, Counting Arrangments ची पाहणी करुन आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. यानंतर आर.ओ. तात्या व्यापारी संकुल येथील सभागृहात सेक्टर ऑफीसर, नोडल अधिकारी व पोलीस प्रशासन यांची संयुक्तीक बैठक घेवुन सर्व सेक्टर यांना त्यांच्या अधिनस्त् असलेल्या बी.एल.ओ. यांच्या बैठक घेवुन, त्यांचा व्हॉटसअप ग्रुप अॅक्टीव ठेवणे, व्होटर स्लिप वाटपाचे नियोजन, होम वोटींगसाठी वाहतुक व वेळेचा आराखडा तयार करणे, सर्व मतदार केंद्राध्याक्ष मतदार अधिकारी यांची नियोजित दिवशी Hands On प्रशिक्षण घेणेबाबत सुचना दिल्यात.

तसेच पोलीस प्रशासन यांना निवडणूक कामी आदर्श आचारसंहितेच्या भंग होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशित केले. या निवडणूक प्रक्रीया अचुकपणे पार पाडणेबाबत मार्गदर्शन केले. पाचोरा तालुक्याची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी चांगली असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सेक्टर ऑफीसर, नोडल अधिकारी,पोलीस प्रशासन, निवडणूकीत कार्यरत असलेले सर्व टिम यांचे अभिनंदन केले.


या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिर, सहायक निवडणूक अधिकारी तथा पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, सहायक निवडणूक अधिकारी तथा भडगाव तहसिलदार शीतल सोनाट, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार व सर्व नोडल अधिकारी, सर्व सेक्टर अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.