जळगाव : आगामी विधानसभा आणि महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार, ७ जुलै रोजी आम आदमी पार्टीची जळगाव जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य प्रभारी गोपाल इटालिया, राज्य प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली व संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात सर्व विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणी व निवडणुकींसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आगामी काळात जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी संघटन मंत्री नाविंदर अहलुवालिया यांनी दिली. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष अँड.राहुल जाधव यांनी आभार मानले. महिला जिल्हा अध्यक्ष अँड. कोमल गायकवाड यांनी सूत्र संचालन केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी निवडून जिल्हा कार्यकारिणी संघटन मंत्री नाविंदर अहलुवालिया आणि जिल्हाध्यक्ष अँड.राहुल जाधव यांच्या सहीने नियुक्तीपत्र देण्यात आले.