जळगाव : गणपती उत्सव असो की मिरवणूक असो या गर्दीमध्ये साप सोडून काही जण गोधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वानी सावध राहिले पाहिजे. सण-उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी करावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार, ३० रोजी केले. आपण सर्वांनी समजदारीने उत्सवाची जबाबदारी पार पाडावी. त्यामुळे शांततेला गालबोट लागणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉलयेथे जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर ग्रामीण विकास मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील गाव, तालुका तसेच जळगाव शहरातील शांतता कमिटीचे सदस्य तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक, गोपनीय शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सुत्रसंचालन केले. सुरुवातील पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेडी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. बैठकीत शांतता कमिटीच्या सदस्यांनी गणेशोत्सव तसेच मिरवणूक या अनुषंगाने सुचना तसेच प्रशासकीय विषयी संदर्भात मते मांडली.
तरुणांवर कट्रोल करण्याची जबाबदारी घ्या
मिरवणुकीत तरुणांना कट्रोल करण्याची जबाबदारी गणेश मंडळानी घेतली पाहिजे. चोपडा येथे एका स्पॉटवर नेहमी गडबड होते. तेथील लोकांना विश्वास घेतले पाहिजे रावेर येथेही प्रणाम कमी झाले. मशिदमध्ये समाजबांधव नमाजासाठी जातात. येथे ज्येष्ठ मंडळींनी मुलांची समजूत घातली पाहिजे. पालकमंत्री पुढे म्हणाले, गणेश उत्सवात मद्यप्राशन करणार नाही. यांचे सर्वांनी पथ्य पाळावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील गाव, तालुका तसेच जळगाव शहरातील शांतता कमिटीचे सदस्य या बैठकीला होते. जळगाव येथे कमिटीच्या सदस्यांना बोलविण्याचा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची घेतलेल्या या उपक्रमाचे अनेक सदस्यांनी कौतुक करून आनंद व्यक्त
प्रभावशील व्यक्तीना नेतृत्वाची संधी द्यावी
पोलीस अधीक्षक यांनी शांतता समितीमध्ये जिल्ह्यातील नव्याने ११२ लोकांना सामावून घेतले. तसेच जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेश मंडळाची एकत्रित बैठक घेण्याचा त्यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला, असे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, समाजावर प्रभाव असलेल्या माणसाला नेतृत्त्वाची संधी दिल्यास त्यांचे चांगले परिणाम मिरवणूकीत दिसतील. पाळधी येथे श्री मिरवणूकीत अतिशय अल्प प्रमाणात गुलालाचा वापर केला जातो. काही लोक गुलालाचा चुकीच्या पध्दतीने वापर करतात. यामुळे गैरसमज होतो. गणेश मंडळानी गुलालाचा वापर कमी केल्यास त्याचेही चांगले परिणाम दिसतील.
– गुलाबराव पाटील, पालकमंत्री
वर्षभर सोबत मग उत्सवात भांडण कशासाठी?
हिंदू मुस्लिम बांधव वर्षभर व्यवहार करतात, बोलतात. सार्वजनिक मिरवणूकीत काही मद्यपी तरुण भांडत बसतात. याने काय साध्य होईल? सर्वांनी सोबत गुण्यागोविंदाने उत्सव साजरे करावे. आपण सर्वांनी समजदारीतून जबाबदारी घेतली तर उत्सव मिरवणूकीत शांतता राहिल वाद, गोंधळ हे कोणालाच अपेक्षित नाही. मिरवणुकीत मिरवणुकीत दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. शिस्त मोडण्याचे कृत्य खपवून घेवू नये. जिल्ह्याची बदनामी होणार नाही. यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, न्यायालयाने दिलेल्या वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे. मागे पुढे या कारणावरुन मिरवणुकीत वाद होवू नये.
– ना. गिरीश महाजन, ग्रामीण विकासमंत्री
महिलांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी
लाडकी बहिण योजनेनुसार गणेश उत्सवात महिलांना जास्तीत जास्त सामावून घ्यावे. मिरवणूकीत दारुबंदी ठेवावी. मिरवणूक वेळेवर सुरु करून वेळेवस्व विसर्जन होईल, यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. मिरवणूकीत एका ठिकाणी थांबून नाच होतो. परंतु वेळेचे बंधन यासाठी पाळले गेले पाहिजे. मिरवणूकीत प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य राहील.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी