जिल्हा दूध संघ निवडणूक प्रक्रिया होणार पूर्ववत 

 

तरुण भारत लाईव्ह न्युज :    जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे. आता 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 11 रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, ती तेथेच थांबविण्यात यावी, असे निर्देश 27 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने दिले होते.राज्यात तसेच जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी, हे स्थगनादेश देण्यात आले होते. नुकतेच राज्य निवडणूक आयोगाने दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवण्यात आली, ती पूर्ववत त्या टप्प्यावर सुरु करण्यात यावी, असे निर्देश दिले असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा दूध संघाची निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्वनियोजित 10 डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकार) संतोष बिडवई यांनी म्हटले आहे.