सोयगाव : स्माईल एज्युकेशन शैक्षणिक मंचाचा जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सोयगाव तालुक्यातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक रामदास लाडूबा फुसे यांना रविवार, ८ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे,भास्करराव पेरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल भोकरे,वारे गुरूजी,संतोष फड,रमेेश ठाकूर,त्र्यंबकेश्वर मोईन यांच्या हस्ते रामदास फुसे यांना जिल्हा आदर्श मुख्याध्यापक प्रदान करण्यात आला. फुसे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगलातांडा शाळेचा कायापलट केले असून मागील शैक्षणिक वर्षी मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात जंगलातांडा ता.सोयगाव शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला होता. अनेक सुधारात्मक बदल फुसे यांनी शाळेत केले आहेत. त्याच बरोबर शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.
याच बरोबर स्माईल एज्युकेशन शैक्षणिक मंचाचा जिल्हा आदर्श शिक्षक तालुक्यातील भागवत गायकवाड यांना जिल्हा आदर्श पदवीधर शिक्षक अविनाश पवार यांना तर आदर्श शालेय व्यवस्थापन समिती पुरस्कार म्हशीकोठा शाळेला प्रदान करण्यात आला.
यासर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सोयगाव गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, गटसमन्वयक तथा केद्रप्रमुख सचिन पाटील, केद्रप्रमुख फिरोज तडवी, नितीन राजपूत, उमेश महालपुरे, गोपाल पाटील, मोतीराम जोहरे, किरणकुमार पाटील, बटेसिंग वसावे, भास्कर चौधरी, नरेंद्र बारी, रविंद्र शेळके यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले.