---Advertisement---

Jalgaon News: जि.प.च्या पदभरती अर्ज प्रक्रियेत उमेदवारांकडून दीड कोटींचा भरणा

by team

---Advertisement---

जळगाव : जिल्हा परिषदेत 626 जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात विविध पदनिहाय विविध संवर्गातील भरती होणार आहे. त्यासाठी सुमारे 15 हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यामाध्यमातून अर्जदारांकडून दीड कोटीचा भरणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्हा परिषदेची कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जंम्बो भरती होत आहे. आयबीपीएसमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

नंतर संवर्गनिहाय आयबीपीएसमार्फत ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभर एका केडरसाठी एकाच दिवशी परिक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार परिक्षा प्रश्नावली आयबीपीएसमार्फत तयार करण्यात आली असून पुढील काही दिवसानंतर परिक्षेची तारीखही जाहिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिक्षेची सर्व प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीकडे असल्याने जिल्हा परिषदेकडे याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---