जिल्हा क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात, मनसेचा थेट आंदोलनाचा इशारा

जळगाव : येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून यामुळे युवा खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या क्रीडा संकुलाची दुरावस्था दूर करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन शुक्रवार, २ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

मैदानावर खड्डे  असून मैदानाची योग्य प्रकारे नियमित देखभाल करण्यात यावी. क्रीडा संकुलातील जिम आणि व्यायामशाळेतील उपकरणे अत्यंत खराब स्थितीत, तुटलेल्या अवस्थेत आहेत. ती त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. क्रीडा संकुलात अस्वच्छता राहत असून शौचालयांत पाणी पुरवठा नाही. स्वच्छतेसाठी नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. क्रीडा संकुलतात तज्ञ प्रक्षिकांची कमतरता आहे. अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षाका अभावी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. प्रशिक्षकांची भरती करण्यात यावी. क्रीडा संकुलात स्वच्छ व पुरेसे प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध करावे. क्रीडा संकुलात अशा विविध समस्या आहेत. या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, पवन सपकाळे, खुशाल ठाकूर, खुशाल ठाकूर, प्रणव चव्हाण, दीपक राठोड आदींची स्वाक्षरी आहे.