राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर : कर्णधारपदी सुष्मित पाटील

जळगाव :राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर करण्यात आला असून कर्णधारपदी सुष्मित पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील आष्टी येथे ३ ते ५ मे दरम्यान आयोजित राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा जामनेर येथे घेण्यात आली. या स्पर्धेतून जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला.  संघ निवड समिती सदस्य म्हणून सचिन सूर्यवंशी (धरणगाव), राहुल साळुंखे (चाळीसगाव), सचिन महाजन (एरंडोल), उमाकांत जाधव (जळगाव) यांनी काम पाहिले.

संघाच्या कर्णधारपदी दोन शालेय राष्ट्रीय व खुल्या चार राष्ट्रीय स्पर्धा खेळलेला खेळाडू सुष्मित गिरीश पाटील याची निवड करण्यात आली आहे.  जिल्ह्याचा संघ जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहिर केला.  संघात शालेय राज्य व राष्ट्रीय स्पर्धा विजयी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. संघ याप्रमाणे. सुष्मित पाटील, मयुर चांडे, सोहम जाधव, पंकज गव्हांडे, संकल्प राजपूत, विनायक सपकाळे, तेजस राऊत, सुमित चिंचोले, सुमित  तायडे, धीरज बारी, पियुष थोरात, निलेश भोई. संघ व्यवस्थापक म्हणून गिरीश महाजन तर संघ प्रशिक्षक म्हणून गिरीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघाचे सराव शिबिर जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालय येथे सुरू असून संघास शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. नारायण खडके, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. आसिफ खान, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, डॉ. रणजित पाटील, प्रशांत कोल्हे, प्रा. हरीश शेळके, विलास पाटील, बी. पी. बेनाडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रोकडे,  प्रा. समीर घोडेस्वार, नितीन पाटील, विजय विसपुते, प्रकाश सपकाळे यांनी काम पाहिले.