DMart Share : डीमार्टच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. डीमार्टचे शेअर्स आज तेजीसह उघडले आणि 15 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली. शेअर 3570 रुपयांवर उघडून थेट 4152 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.
एव्हेन्यू सुपरमार्ट्सने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये जाहीर केले की, डिसेंबर 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल 13,247.33 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याच कालावधीत, कंपनीचे एकूण स्टोअर्सची संख्या 387 पर्यंत वाढली.
ब्रोकरेज हाऊसचा डीमार्ट शेअर्सवरील वेगवेगळा दृष्टिकोन
डीमार्टच्या तिमाही निकालांनंतर विविध ब्रोकरेज हाऊसने त्यांच्या रेटिंग्स आणि टार्गेट जाहीर केले आहेत.आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज मॅक्वेरी आणि मॉर्गन स्टॅनली यांनी स्टॉकवर घसरणीचे रेटिंग कायम ठेवले आहे.
हाँगकाँगस्थित ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने मात्र तेजीचा दृष्टिकोन कायम ठेवत शेअरवर आउटपरफॉर्म कॉल दिला आहे आणि टार्गेट 5,360 रुपये निश्चित केले आहे.
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
काल डीमार्टचा शेअर 3568 रुपयांवर बंद झाला होता. आज तो थेट 4165 रुपयांवर पोहोचला. अशा परिस्थितीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे 150-200 शेअर्स असतील, तर त्याला एका दिवसात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाल्याची शक्यता आहे.
डीमार्टच्या विस्ताराचा प्रवास
एवेन्यू सुपरमार्ट्स, राधाकिशन दमाणी आणि त्यांचे कुटुंब चालवत असलेल्या DMart चेनमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, एनसीआर, तामिळनाडू, पंजाब आणि राजस्थानमधील विविध शहरांमध्ये स्टोअर्स आहेत.