weight Loss: झटपट वजन कमी करायचंय …करा ‘हे’ घरगुती उपाय

#image_title

weight Loss: बदलती जीवनशैली, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणे, एका जागी बसून जास्तवेळ काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यात बहुतेक लोक व्यायाम करायचाही कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा निर्माण होतो. वाढलेलं वजन आणि लठ्ठपणामुळे लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

अनेक जण पोट कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. तर जाणून घेऊया काही काही घरघुती उपाय ज्याने वजन कमी करण्यासाठी अधिक मदत मिळू शकते.

जिऱ्याचे पाणी
जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही १ चमचा जिरे रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी या जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासह पोटाच्या आरोग्यासाठीही याचा फायदा मिळतो.

ओव्याचे पाणी
ओवा हा सामान्य सर्दीच्या व्हायरसशी लढा देण्याचे काम करते याशिवाय पोटासंबंधित त्रासही ओव्यामुळे कमी होतात. मात्र याशिवाय वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा भिजवा आणि सकाळी उठून हे पाणी उकळा. कोमट झाल्यावर गाळून हे पाणी प्या.

मध आणि लिंबू पाणी
लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर १ ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात १ चमचा मध घालावे. याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. तसंच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते.

चण्याचे सत्तू
भाजलेल्या चणा डाळीची पावडर ज्याला सत्तू असे म्हटले जाते. याचा तुम्ही वापर करून वजन लवकर कमी करू शकता. सत्तूमध्ये अधिक प्रमाणात फायबर असून याच्या सेवनाने लवकर भूक लागत नाही आणि वजन लवकर कमी होते. तसंच यामध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असल्याने वजन वाढण्याची शक्यता राहात नाही.