थंडीच्या दिवसात मेथी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

#image_title

हिवाळा ऋतू सुरु झाला आहे आणि हा तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी एकदम योग्य असा काळ आहे. हिवाळा ऋतूमध्ये खूप फळ आणि भाज्या बाजारामध्ये येतात, ज्या खाल्ल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. पण ताज्या हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतात.

काही लोक शरीरातील प्रोटीन इनटेक वाढविण्यासाठी हिरव्या भाज्या खातात. काही लोक फायबर इन्टेक वाढविण्यासाठी फूड किंवा हिरव्या भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करतात.

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे, मेथी शरीरामध्ये उष्णता वाढविण्यासाठी बॉडी टेम्परेचर स्थिर ठेवण्यासाठी मदत करते. पण मेथी खाण्याचे अजूनही काही फायदे आहेत. म्हणूनच मेथीचा आपल्या आहारात कोणत्याही स्वरुपात समावेश केला पाहिजे असे डॉक्टर सांगतात.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही तुमच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. ज्यामुळे तुम्हाला टाईप 2 मधुमेहाच्या समस्येपासून वाचता येवू शकते.

शरीरात उष्णता निर्माण करते
मेथीची भाजी शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसात मेथीच्या भाजीचे सेवन केल्याने शरीराचे थंडीपासून संरक्षण होते आणि नैसर्गिक रित्या उबदार वाटते.

त्वचा निरोगी ठेवते
मेथीच्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचेला मुलायम आणि चमकदार तसेच सुंदर बनवण्यास मदत करतात. अशा प्रकारे हे निरोगी त्वचेसाठी औषधासारखे काम करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते
त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि बदलत्या ऋतूंमध्ये आपल्याला निरोगी ठेवू शकते.

सूज कमी करते
मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यास मदत करतात. तथापि यावर कोणतेही संशोधन आतापर्यंत झाले नाही.

वजन कमी करण्यास करते
मेथीची भाजी वजन कमी करण्यात खूप मदत करते. असे संशोधनात आढळून आले आहे जर तुम्ही नियमितपणे मेथीच्या भाजीचे सेवन केले तर ते 17 टक्क्यांपर्यंत चरबी कमी करण्याचं काम करते.