बारामाती : माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरकली नाहीत. आता ती गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय, एकदा मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणी देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या लढतीत अजित पवार यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय असे चित्र दिसत आहे. यात शरद पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात उतरले आहेत. त्यांनी सुप्रिया सुळे प्रचाराला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोणाचे नाव न घेता कुटुंबातील लोकांना त्यांनी इशारा दिला आहे.
ते नंबर पाहून वाईट वाटले
बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे उभे राहणार होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी समजूत काढल्याने शिवतुरे यांनी माघार घेतली. परंतु, अनेकांनी त्यांना फोन करून माघार घेऊ नये असे सुचविलं. ते नंबर पाहून वाईट वाटले. हे नंबर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. सध्या कुठल्या पातळीचे राजकारण चालले आहे, हे दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.