थंडीत त्वचा कोरडी पडली? करा ‘हे’ उपाय

तरुण भारत लाईव्ह । ३ जानेवारी २०२३। अवघ्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. यामुळे आरोग्याविषयी समस्या जाणवू लागल्या आहेत. या ऋतूमध्ये आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. काही लोकांना थंडीमध्ये त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. तसेच कमी किंवा जास्त तापमानामुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचा कोरडी झाल्याने त्वचेवर मुरूम आणि खाज येते. काही लोकांची त्वचा हे पांढरी पडते. यावर कोणते उपाय करावे, जेणेकरून अशा समस्येपासून आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया तरुण भारतच्या माध्यमातून.

तेलाने मालिश करणे: थंडीमध्ये तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर तुम्ही अंघोळीच्या एक तास आधी तुमच्या शरीराला खोबरेल तेलाने किंवा बदामाच्या तेलाने मालिश करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होईल.

भरपूर पाणी प्या: थंडीमध्ये पाणी भरपूर पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. तसेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसायला लागतो. पुरेस पाणी न प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे.

 नियमित व्यायाम : थंडीमध्ये आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला गरज असते ते म्हणजे, नियमित व्यायामाची किंवा तुम्हाला व्यायामाची सवय नसेल तर तुम्ही सकाळी फिरायला जाऊ शकता. सकाळी फिरण्यामुळे तुमचा एकप्रकारे व्यायाम होऊन जातो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास मदत होईल.

ताजी फळे खा: थंडीमध्ये ताजी फळे खाल्याने तुम्हाला पुरेस व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम मिळण्यास मदत होईल. सीताफळे, अननस, यासारखी फळे खाल्याने त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.