सहाय्यक पोलीस निरीक्षकांची दबंग कामगिरी; २० फुट खोल पाण्यातून मृतदेह काढला बाहेर

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ ।  शहादा तालुक्यातील जवदा येथील के.टी.वेअर बंधार्‍यात ३५ वर्षीय इसमाने उडी घेतली, त्या ठिकाणी १५ ते २० फूट पाण्याची खोली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी स्वतः त्या इसमाच्या मृतदेह बाहेर काढत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. कदाचित असे कर्तव्य बजावणारे पहिलेच अधिकारी असल्याने सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शहादा तालुक्यातील जवदा येथील के.टी.वेअर बंधार्‍यात दि. ३० नोव्हेंबरला मध्यप्रदेश राज्यातील लालसिंग शिवराम चव्हाण (वय ३५, रा.देवधर ता. पानसेमल,जि.बडवाणी) या व्यक्तीने उडी घेतली. दोन दिवसापासून मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती. परंतु शर्तीचे प्रयत्न करूनही हाती काहीही मिळत नव्हते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी १५ ते २० फूट पाण्याची खोली होती.

परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या सोबत प्रकाशा (ता. शहादा) येथील सीताराम पुंजू भोई यांना बोलावून त्यांच्यासोबत स्वतः ठिकाणी सोबत घेऊन पाण्यात उतरून त्या व्यक्तीला बाहेर काढून आपले कर्तव्य बजावले.