---Advertisement---

भारतावर २४ तासांत लादणार अतिरिक्त शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

---Advertisement---

भारत चांगला व्यापारी भागीदार नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील २४ तासांत मोठ्या प्रमाणावर टैरिफ अर्थात् व्यापारी शुल्क लादणार आहे. रशियाकडून खनिज तेल खरेदी करून त्यांच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याची किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी ट्रम्प म्हणाले, भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेच्या वस्तूंवर सर्वाधिक कर लादतो, ही आमच्यासाठी अडचण आहे. पर्यायाने अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार नगण्य आहे आणि त्यामुळे मोठ्या – प्रमाणात आम्हाला नुकसान सहन करावे लागत आहे.

वर्षानुवर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार बंद करण्याचा – निर्णय मी घेतला आहे. भारत आमच्यासाठी चांगला भागीदार नाही. मी यापूर्वी त्यांच्यावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटाघाटीसाठी आठवडाभराची मुदत दिली. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्यांनी रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. भारतावर २४ तासांत मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्क लादले जाणार आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला मदत करणे मला मुळीच आवडले नाही, त्यामुळे याची किंमत त्यांना मोजावी लागेल.

करारासाठी सक्ती करू शकत नाही: रणधीर जयस्वाल

ट्रम्प यांच्या धमकीवर परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते रणधीर भारतीय मंत्रालयाचे जयस्वाल म्हणाले, व्यापारी करारासाठी कोणताही देश आमच्यावर सक्ती करू शकत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---