रशियाकडून भारतापेक्षा दुप्पट तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अत्यल्प शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा

---Advertisement---

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड म्हणून भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादले. आधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्यास १४ तास बाकी असताना, ट्रम्प यांनी हा नवा आदेश जाहीर केला आहे. मात्र, जे देश भारतापेक्षा दुप्पट तेल रशियाकडून खरेदी करतात त्यांच्यावर अत्यल्प कर लावला आहे.

दरम्यान, भारत आता जागतिक स्तरावर सर्वाधिक अमेरिकन टैरिफचा सामना करत आहे. भारताबरोबर ब्राझीलवरही अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू करत असल्याची घोषणा केली आहे. वरच्या श्रेणीतील काही देशांवर अमेरिकेने भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावले आहे. स्वित्झर्लंड वर ३९ टक्के, कॅनडा व इराकवर ३५ टक्के आणि चीनवर केवळ ३० टक्के आयात शुल्क लावले आहे.

अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२४ मध्ये अमेरिकेने भारताकडून ८७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तू खरेदी केल्या. याच काळात भारताने अमेरिकेकडून ४१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. दरम्यान, भारताने अनेकदा युक्तिवाद केला आहे की पाश्चात्य देश निर्बंध व आर्थिक दंड लावताना दुजाभावाने वागत आहेत. हंगेरीसारखे युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश रशियाकडून थेट पाइलपाइद्वारे कच्चे तेल आयात करत आहेत. परंतु, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. परंतु, रशियाकडून तेल आयात केलं म्हणून भारतावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादत असताना अमेरिकेने रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनला मात्र थोडी सूट दिली आहे. कारण अमेरिका सध्या चीनकडून ३० टक्के आयात शुल्क वसूल करत आहे. चीन हा रशियन ऊर्जेचा सर्वात मोठा ग्राहक असूनही अमेरिकेने चीनकडून कुठलाही दंड आकारलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---