जनजागृतीसाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयाची गणपती मूर्ती दान

जळगाव :  प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठा प्रश्न आहे. यात स्थानिक पातळीवर प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम घ्यावेत आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करावं, असं नेहमीच बोललं जातं. मात्र आता या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाप्रसंगी होणारे प्रदूषण हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यावर एक उपाय म्हणून पालिकेने आता गणपती ‘विसर्जना ऐवजी दान करा’ या उपक्रमाला  सुरुवात केली आहे.

गणेशमूर्ती दानाचा अभिनव उपक्रमामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला आहे. जळगाव महानगरपालिकेमार्फत यंदाही गणेशमूर्ती दानाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गणेश मूर्तींचं विसर्जन तलाव, नदीपात्र  न करता गरजूंना  गावातील , रस्त्यांवरील इच्छुक भाविकांना पूजनासाठी दान करण्याचा  महानगरपालिकेने घेतला आहे.

बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करा:
अनंत चतुर्दशी दिवशी हा उपक्रम राबवण्यात येतो. ज्या गणेश भक्तांना बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याची इच्छा असेल त्यांनी या संकलन केंद्राशी संपर्क करण्याचं आवाहन जळगाव महानगरपालिकेने केले होते. यंदा अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक आणि समाज उपयोगी संदेश देणारे देखावे साकारण्याचा प्रयत्न केला.  यावर्षी  प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठ्या प्रश्नाला मदत म्हणून आम्ही शाळेचे मूर्ती महापालिकेला दान करत आहोत. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.