केळी खाल्ल्यानंतर चुकूनही ‘हे’ काम करू नका, अन्यथा होईल नुकसान

---Advertisement---

 

वाढत्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी दररोज फळे खाणे गरजेचे असते. जरी आंबा हा फळांचा राजा असला तरीही केळी हे फळ त्यापेक्षा कमी नाही. केळी हे असे फळ आहे जे सर्वांच्या मनावर राज्य करतं. प्रत्येक ऋतूत मिळणारे हे फळ किमतीत खूप स्वस्त आहे पण गुणांनी परिपूर्ण आहे. केळीमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे भरलेली आहेत. दररोज एक केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. दररोज केळी खाल्याने त्वरित ऊर्जा मिळते तसेच शरीर मजबूत राहते, पोटाच्या समस्या दूर राहतात ,रक्तदाब नियंत्रित राहते पण हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळी खातात. हो, असे म्हटले जाते की फळे खाल्ल्यानंतर काही काळ इतर गोष्टी खाणे टाळावे. काही लोकांना सवय असते की काहीही खाल्ल्यानंतर ते लगेच पाणी पितात. जर तुम्हीही असे केले तर ही सवय लगेच बदला. विशेषतः केळी खाल्ल्यानंतर जास्त वेळ पाणी पिऊ नये.

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये

आयुर्वेदात केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण केळी हे फळ पचण्यास अतिशय जाड असते. त्यामळे केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते. केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने सर्दी, खोकला आणि ताप देखील येऊ शकतो. असे केल्याने काही लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास देखील होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. रक्तातील साखर वाढण्याची समस्या त्रासदायक ठरू शकते.

फळ खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे

फळ खाल्ल्यानंतर सुमारे १ तासानंतरच पाणी प्यावे. फळ खाल्ल्यानंतर १ तासानंतरच कोणतेही द्रवपदार्थ सेवन करावे. हाच नियम इतर फळांनाही लागू होतो. म्हणून याची विशेष काळजी घ्या.

केळी खाल्ल्यानंतर काय खाऊ नये

केळीसोबत दूध किंवा त्याचे पदार्थ जसे की ताक आणि दही खाणे टाळा. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. केळीसोबत मध आणि तूप खाणे टाळा. केळी आणि अंडी एकत्र खाऊ नये. यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.

केळी कधी खावी?

आयुर्वेदात रात्री केळी खाण्यास मनाई आहे. केळी पचण्यास बराच वेळ लागतो, म्हणून संध्याकाळी उशिरा किंवा रात्री केळी खाऊ नका. केळी हे फळ थंड मानले जाते, म्हणून ते रात्री खाऊ नये. ज्यांना कफाची समस्या आहे त्यांनी केळी खाणे टाळावे. काही लोकांना सकाळी केळी खाल्ल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. म्हणून, केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्यानंतर किंवा नाश्त्यासोबत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---