Diwali 2024: दिवाळी या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या शुभ दिवशी देवी-देवतांची पूजा केली जाते. तसेच लोक फुलं, दिवे आणि दिव्यांनी आपली घरे सजवतात.दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा मानला जातो. या दिवशी अनेक जण फटाक्यांची आतिषबाजी करत हा सण खूप उत्साहात साजरी करातात.
दिवाळीच्या या शुभ दिवसात अश्या काही गोष्टी असतात ज्या आपण टाळल्या पाहिजे. कारण त्या लक्ष्मी देवीची कृपा कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात. दिवाळीच्या दिवसात कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल छोटीशी माहिती.
धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नयेत. काचेचा संबंध राहुशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचे भांडे खरेदी करू नयेत, या दिवशी काचेची भांडी खरेदी केली तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
काळ्या गोष्टी
काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत. यामुळे कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत होते, ज्याच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. विशेषतः तब्येत बरी नाही.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करू नये?
नरक चतुर्दशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नका.
नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची दक्षिण दिशेला कचरा ठेवू नका.
नरक चतुर्दशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला दान करणे टाळावे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी दुपारी झोपणे टाळावे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी नखे कापू नका.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक शास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.