जळगाव : परधाडे स्थानकाजवळ एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना रेल्वेने धडक दिली असून, या दुर्घटनेत काही प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना आग लागल्याचा संशय आला. या भीतीने काही प्रवाशांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून उडी मारली. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस, तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आहे. जखमी प्रवाशांना तातडीने जळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची भीती वास्तव आहे का, याचा शोध रेल्वे प्रशासन घेत आहे. यासोबतच प्रवाशांनी ट्रेनमधून उडी का मारली, याबाबतही तपास सुरू आहे.
Pune News : अखेर पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतीला मिळाला न्याय
परधाडे स्थानक परिसरात या दुहेरी अपघातामुळे मोठी गर्दी जमली आहे. प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून, पुढील तपास सुरू आहे.