डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून, समाज उत्थानाचे काम करावे :  पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

 

जळगाव :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे अगाध आहे. त्यांच्या या विविधांगी पैलूमुळे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे उजळून निघते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही प्रणाली व्यवस्था यांच्यामध्ये एक अतूट नाते बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि विचारांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे डाॅ. बाबासाहेबांचे विचार हे कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे. शिका , संघटीत व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र जोपासून त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया..!  असे प्रतिपादन  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ग्रा.पं.सदस्य सुनील बडगुजर यांनी तर. आभार मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हा प्रमुख नाना भालेराव यांनी मानले.

यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका प्रमुख डी. ओ.पाटील. सरपंच नाना बडगुजर , वाघळुद सरपंच हुकुम पाटील , भोद सरपंच राजु पाटील , सोसायटी चेअरमन मनोज मालु,
चिंचपुरा सरपंच आशाबाई कैलास पाटील ,उपसरपंच शिवाजी नन्नवरे, ग्रा.पं. सदस्य कैलास पाटील, गुलाब मोरे,  ईश्वर सपकाळे व सिद्धार्थ मित्र मंडळ, ग्रा.पं. सदस्य संजय मोखर , प्रकाश लोखंडे , शालिक दोडे , सिराज कुरेशी , आशिष सपकाळे आदी उपस्थित होते.

असोदा येथे पूर्व संध्येला पुतळ्यास माल्याअर्पण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आसोदा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास माल्याअर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लखन जोहरे, उपसरपंचपती गिरीश भोळे, तुषार महाजन, सुनील पाटील, उमेश पाटील, जीवन सोनवणे, बापू महाजन, अजय पाटील, शरद नारखेडे, गोटू नारखेडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते