काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार; डॉ. पाटलांचा शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

जळगाव  : काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील आणि पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज २४ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. विशेषतः ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. उल्हास पाटील कन्या डॉ. केतकी पाटीलसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. दरम्यान भाजप पक्ष प्रवेशापूर्वीच  डॉ.उल्हास पाटील यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केल्यामुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मुबंईत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे  काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.