---Advertisement---

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनित्ताने चित्रकला व प्रशमंजुषा स्पर्धा उत्सहात

by team
---Advertisement---

 

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे शनिवार, १३ रोजी गणेश कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं. स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खूप अशा खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला. यानिमित्त समितीचे अध्यक्ष राजेश शिरसाट, कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, उपाध्यक्ष भारती रंधे, सचिव आशिष सपकाळे, सतीश गायकवाड, गणेश पगारे, खजिनदार नितीन मोरे व जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment