नियंत्रण रेषेवर ड्रॅगनची पाकिस्तानला मदत.

जम्मू  काश्मीर :चीन पाकिस्तानी लष्कराला हवाई आणि लढाऊ वाहने पुरवण्यासोबत संरक्षण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करीत आहे. यासाठी दळणवळण टॉवर्स उभारले जात आहेत तसेच नियंत्रण रेषेवर भूमिगत केबल्स टाकल्या जात आहेत

पाकिस्तानचा जवळचा मित्र असल्याचे दाखवून व्याप्त काश्मिरातील आपल्या सीपीईसी आणि जलविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी चीन ही पावले उचलत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अलिकडेच विकसित करण्यात आलेली आणि ट्रकवर ठेवता येणारी एसएच-१५ ही १५५ मिमी हॉवित्झर तोफ नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी दिसली होती. सर्वांत पहिले ती पाकिस्तानात  दिसली होती, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

‘शूट अ‍ॅण्ड स्कूट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या २३६ एसएच१५ तोफा खरेदी करण्यासाठी पाकिस्तानने चिनी कंपनी नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडला  कंत्राट दिले आहे आणि याची पहिली खेप जानेवारी २०२२  मध्ये दाखल झाल्याचे वृत्त लंडन येथील जेन्स या संरक्षण मासिकाने दिले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकार्‍यांची आघाडीच्या चौक्यांवरील वावर सर्वप्रथम२०१४ मध्ये दिसून आला होता. केवळ इतकेच नव्हे तर चिनी पथके आणि अभियंते नियंत्रण रेषेवर इमारती, जमिनीखालील बंकर्ससार‘या पायाभूत सुविधा उभारत असल्याचे काही पकडण्यात आलेल्या संदेशांमधून स्पष्ट झाले होते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

लष्कराने या मुद्यावर मौन बाळगले आहे: 

परंतु, गुप्तचर संस्थाना नवी माहिती दिली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. ४६अब्ज डॉलर्सच्या सीपीईसी प्रकल्पामुळे येथे चिनी सैन्याची उपस्थिती आहे.  या अंतर्गत कराचीतील ग्वादर बंदर चीनने अनधिकृतपणे ताब्यात घेतलेल्या काराकोरम महामार्गाद्वारे चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडले जाईल.

चीन नेहमीच पाकिस्थानला मदत करतो हे परत एकदा स्पष्ट झाले आहे.