Diwali 2024 : वसूबारस या दिवसापासून दिवाळीची धामधूम सुरू होते. यादिवशी ग्रामीण भागात गाय आणि वासरूची पूजा केली जाते. आकर्षक रांगोळी काढून दार सजवले जाते.
गायीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. घरात दिवे लावून रोषणाई केली जाते. दारात दिवा लावला जातो.
दारात आकर्षक रांगोळी काढून दार सजवले जाते. जर तुम्हीही वसुबारस निमित्त चांगली रांगोळी डिझाइन शोधत असाल तर तुही या रांगोळ्यांनाच वापर करू शकता.
ज्या बनवायला अगदी सोप्प्या आणि दिसायला खूप सुंदर आहेत.