---Advertisement---
शत्रूकडून होणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणारी अभेद अशी अत्याधुनिक क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. डीआरडीओ आणि आपआयटी दिल्लीच्या संशोधकांनी लष्करासाठी उपयुक्त ठरणारी क्वांटम एन्टँगलमेंट फ्री स्पेस क्यूकेडी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली भविष्यातील युद्धात भारतीय सैनिकांच्या संवादासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अत्याधुनिक प्रणाली विकसित केल्याबद्दल संशोधकांचे अभिनंदन केले. अभेद्य असलेली क्वांटम संवाद प्रणाली शत्रूला भेदणे अशक्य आहे. सैन्याची हेरगिरी करणे आणि सायबर हल्ला रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
क्वांटम एन्टँगलमेंट या प्रणालीचा वापरून एक किमीपेक्षा जास्त अंतरावर फ्री स्पेस क्वांटम सुरक्षित संप्रेषण स्थापित केले. हा प्रयोग डीआरडीओ संशोधकांच्या मार्गदर्शनात आयआयटी दिल्लीच्या परिसरात फ्री स्पेस ऑप्टिकल लिंकद्वारे करण्यात आला. या प्रयोगात, २४० बिट्स प्रति सेकंदात सुरक्षित क्यूकेडी साध्य करण्यात आला.
लष्कराची गोपनीय माहिती हॅक करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाने शत्रूकडून करण्यात येणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणे या प्रणालीद्वारे शक्य होणार आहे. यामुळे युद्धावेळी लष्कराकडून करण्यात येणारा संवाद अतिशय गोपनीय राहणार आहे.
कसे कार्य करणार तंत्रज्ञान?
क्वांटम एन्टँगलमेंट-आधारित क्यूकेडी तंत्रज्ञान पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. एखादा हॅकर किंवा गुप्तहेर ही प्रणाली चोरण्याचा प्रयत्न केल्यास क्वांटम स्थिती बदलते.