लाल समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला

नवी दिल्ली :  क्रूड ऑईल घेऊन भारताकडे येणाऱ्या जहाजावर येमनच्या हूथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. लाल समुद्रात भारतीय झेंडा लावलेल्या जहाजावर हा हल्ला करण्यात आला आहे. M/V साईबाबा या जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स होते. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

शनिवारी भारतीय सागरी हद्दीमध्ये एका जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले होते. त्यानंतर आता आणखी एका जहाजावर हल्ला झाला असल्याने चिंता वाढली आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment