Dule Crime News: महिलांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत आहे. अश्यातच धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, उत्तर प्रदेशातील एका १६ वर्षीय मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर अज्ञातांनी अत्याचार केल्याची घटना जौनपूर जिल्ह्यात घडली, त्यानंतर ही मुलगी धुळ्यात गर्भावस्थेत आढळून आली. मुलीच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिसांत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्या अज्ञानाचा फायदा घेत अज्ञातांनी अत्याचार केला, यात मुलगी गर्भवती राहिली सदर प्रकारामुळे तिची मनःस्थिती बिघडली. त्यानंतर ती घरात कुणाला काहीही न सांगता थेट धुळे शहरात आली, धुळे तालुका पोलिस मोराणे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना पीडित मुलगी आढळून आली. पोलिसांनी सदर मुलीची आस्थेवाईपणे चौकशी केली असता मुलीने हकीकत कथन केली. मात्र, तिची मनःस्थिती खराब असल्याचे निदर्शनास येताच तिचे समुपदेशन करण्यात आले.
त्यानंतर पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या आईला पोलिसांनी धुळ्यात बोलावले. पीडितेच्या आईने धुळे तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर पोक्सो कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणा न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला