---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह ।२५ फेब्रुवारी २०२३। गुजरात मधून अपघाताची बातमी समोर येतेय. रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वड़ोदरामधून नायक परिवार सोखड़ा येथे लग्नासाठी गेले होते. तिथून परत येत असताना रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून तीन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. 28 वर्षीय अरविंद पूनम नायक, 25 वर्षीय काजल अरविंद नायक, 12 वर्षीय शिवानी अल्पेश नायक 5 वर्षीय गणेश अरविंद नायक आणि 10 वर्षीय दृष्टि अरविंद नायक या लोकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
एर्टिगा कारच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या कार चालकाचं नाव जयहिंद यादव असं आहे. त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याची अधिक चौकशी करण्यात येणार आहे.