जळगाव जिल्ह्यात लोकसभा आचारसंहिता काळात प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव :  लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात म्हणजे 14 एप्रिल ते आतापर्यत विविध तालुक्यात 8 ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसहिता भंग अंतर्गत 14 एप्रिल रोजी रावेर लोकसभा मतदार संघातर्गत जामनेर येथे रा. काँ. शरदचंद्र पवार गटाकडून मेळावा आयोजीत करण्यासंदर्भात विनापरवानगी फलक लावण्यात आला. यावरून जामनेर शहर अभियंता तथा फ्लाईंग स्क्वाड पथक प्रमुख प्रदिप धनके यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 24 एप्रिल रोजी एमएच 19 सीझेड 8569 क्रमांकाच्या वाहनातून 8 लाख 65 हजार 100 रूपये रोख रकम नेत असल्याचे एसएसटी पथक इनचार्ज किरण वायसे यांना आढळून आले. त्यानुसार रोख रकम जिल्हा कोषागार अधिकारी राजेन्द्र खैरनार यांच्याकडे सोपविण्यात आली असून सुरेशकुमार बात्रा, भुसावळ याच्याविरूद्ध जिल्हा आचारसहिता पथकाकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे.
अमळनेर येथे 1लाख 20 हजार रूपये किमतीचा 7 कि.900 ग्रॅम गांजा अवैध वाहतूक करताना सजन राजू पावरा याच्या विरूद्ध पो.कॉ.अमोल पाटील यांच्या तक्रारीवरून, तर 21 एप्रिल रोजी राज्यात बंदी असलेली सुगंधीत तंबाखू व गुटका असा 66हजार 308 रूपये किमतीच्या मालाची अवैध वाहतूक केल्यावरून अमोल पवार बोहार्डी ता.शिरपूर याच्याविरूद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात एसएसटी पथक प्रमुख सुनिल पाटील यांच्या तक्रारीनुसार तसेच 26 एप्रिल रोजी एफएसटी पथक क्र.5 प्रमुख अशोक माळी यांच्या तक्रारीवरून 100 लिटर गावठी दारूची अवैध वाहतूक केल्यावरून भावेर ता.शिरपूर येथील अविनाश कोळी व अन्य एकविरूद्ध गुन्हा दाखल आहे. शिवाय पाचोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात आशीश तोतला याच्याविरूद्ध 1लाख 53हजार 990 रूपये किमतीचा अवैध गुटका, तसेच पवन चव्हाण सोयगाव जि.संभाजीनगर याच्याविरूद्ध 16390 रूपयांचा गुटका, याशिवाय सैय्यद मुसा सैय्यद दादामिया याच्याविरूद्ध 1लाख 6हजार 699 रूपयांचा अवैध गुटका वाहतूक करताना आढळल्यावरून एसएसटी पथकाचे स्वप्निल परदेशी, दिनेश पाटील, एफएसटी पथक क्र.2 चे जयेंद्र पगारे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली