---Advertisement---
Jalgaon News : आगामी जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूकीत दहशत पसरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उपद्रव व्यक्तींचे पोलिसांच्या प्रस्तावानुसार १४ दिवसांसाठी शहरातील २४ जणांना तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांच्या आदेशानुसार जळगाव शहर पोलीस ठाणे अंतर्गत सहा तर एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत १८ जणांना यामध्ये समावेश आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातून आलेल्या या प्रस्तावांची अवघ्या पाच दिवसात दखल घेत नोटीस काढुन पाच दिवसात आदेश काढले. यात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांच्या समन्वयातून या कारवाईला गती लाभली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच शहर पोलीस ठाणे निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर बुधवारी (३१ डिसेंबर) सुनावणी करण्यात आली. त्यानुसार रविवार (४ जानेवारी) रात्री १२ वाजेपासुन ते १७ जानेवारी सकाळी आठ वाजेपावेतो हद्दपार करत संशयितांना शहरात शिरकाव करण्यास मज्जाव केला आहे. १५ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीत मतदान करण्यासाठी संशयितांना दोन तास शहरात येण्याची परवानगी दिली आहे. मतदान झाल्यानंतर संशयितांना पुन्हा शहर सोडण्याचे नमुद केले आहे.
शहरातून सहा तडीपार
तडीपार केलेल्या संशयितांमध्ये त्यानुसार तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (रा. उस्मानिया पार्क), रँचो उर्फ रमजान भिकन शेख (रा. गेंदालाल मिल), सरफराज जावेद भिस्ती (रा. वस्ती मोहल्ला, शाहुनगर), गुफरान शेख करीम (रा. गेंदालाल मिल), जुबेर उर्फ डब्बल भिकन शेख (रा. गेंदालाल मिल), युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (रा. गेंदालाल मिल यांचा समावेश आहे.
एमआयडीसीतून १८ तडीपार
एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत दिशांत उर्फ दादू देविदास सपकाळे, रितेश उर्फ चिण्या कृष्णा शिंदे (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी), मुकेश रोहिदास झाल्टे (रा. नागसेन नगर), ललीत उमाकांत दीक्षीत, गोलु उर्फ दत्तु नारायण चौधरी (दोन्ही रा. ईश्वर कॉलनी), सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी), आकाश उर्फ राधे अजय सोनार (रा. पंचमुखी हनुमान परिसर), विशाल राजु अहिरे (रा. नागसेन नगर), उदय रमेश मोची (रा. म `हरुण), संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (रा. कुसुंबा), किरण उर्फ टुंड्या किरण कोळी (रा. साईसिटी कुसुंबा), शेख असरार शेख मक्तार (रा. मास्टर कॉलनी), सागर आकाश दहेकर (रा. कंजरवाडा जाखनीनगर), आशुतोष सुरेश मोरे (रा. रामेश्वर कॉलनी), सोनु उर्फ ललीत गणेश चौधरी (रा. ईश्वर कॉलनी), चेतन वसंत देवुळकर (रा.एकता कॉलनी), आकाश भास्कर विश्वे (रा. सुप्रिम कॉलनी), मायकल उर्फ कन्हैय्या नेतलेकर (रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांचा हद्दपार केलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांकडून ९८ प्रस्ताव
उपद्रवी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील ९८ जणांना निवडणूक कालावधीत हद्दपार करण्याचे प्रस्तावित असुन एकुण ७८ जणांविरुध्दचा तडीपार प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. काही उपद्रवी असलेल्या सुमारे १५० इसमांना नोटीस देण्याचे प्रस्तावित असुन ६१ जणांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.









