पाचोरा : चाळीसगाव शहर बसस्थानक आवारात नियंत्रण कक्षासमोर गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीस शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार चाळीसगाव शहरात पोउनि सुभाष पाटील,पोहेकॉ राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेद्र पाटील, पोका समाधान पाटील,अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे रात्री 3.40 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. त्यातील पोकॉ समाधान पाटील, अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर एक प्रवासी संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आला. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गणेश तुकाराम पवार (वय – २५ )(रा. बोरमाळी, पो.नागद, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर,हल्ली मुक्काम रा.नानेकर वाडी,चाकण, ता.खेड जिल्हा पुणे) असे
सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ देशी कट्टा व पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुस गावठी आढळून आले. पोलिसांनी त्याजवळील कट्टा व काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी पो. कॉ. समाधान पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशन ला आरोपविरोधात गुरुन 297/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 03,25,29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय माळी हे करीत आहे.