Dussehra festival : उद्या साजरा होणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला. प्रभू रामाने प्रत्येक परिस्थितीत सत्याचा मार्ग निवडला. दुसरीकडे, रावण हा मोठा विद्वान असूनही अधर्माचा मार्ग निवडला होता. सीतेच्या अपहरणानंतर जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा प्रचंड सैन्य असूनही रावणाचा पराभव झाला. तेव्हापासून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात. दसऱ्याच्या दिवशीही अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. अशा रीतीने वाईटाचा नाश होऊन जगात चांगुलपणाची स्थापना होते.
दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराचे अंगण सजवण्यासाठी रांगोळी काढतात. तुम्हालाही तुमच्या घराचे अंगण सुंदर रांगोळीने सजवायचे असेल तर तुम्ही या आकर्षक रांगोळ्या वापरू शकता.
Cyber Security : देशात सायबर सुरक्षेत महाराष्ट्र सर्वात अव्वल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस