तरुण भारत लिव्ह न्युज ।१ जानेवारी २०२३। संपूर्ण जगाने काल नवीन वर्षाचं स्वागत केलं असताना आज पहाटे नवीन वर्षाच्या दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या आधी सुद्धा नोव्हेंबर २०२२ मध्ये दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांनतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. पण यावेळेला कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.
दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या परिसरात रात्री १ वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यांनतर काही काळ लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचं केंद्र होतं. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी नोंदवण्यात आली. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आणि आसपासच्या परिसरात सकाळी 1 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. त्याची तीव्रता 3.8 इतकी नोंदवण्यात आली. हरियाणाच्या झज्जर येथे भूकंपाचे केंद्र होते. तसेच त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर आत होती.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोकांनी घरातून पळ काढला. दरम्यान, 2022च्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 2.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचं केंद्र दिल्लीच्या पश्चिमेकडे होते. त्याआधी 12 नोव्हेबर रोजी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि बिजनौरला भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा धोका टळल्याचं लक्षात येताच पुन्हा नागरिक आपल्या घरात गेलेत. जेव्हा 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवली गेली होती. त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.