यूट्यूबर एल्विश यादव-फाजिलपुरियावर ईडीची कारवाई, मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वादग्रस्त YouTuber एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने यूपी आणि हरियाणामधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने याआधी एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांचेही जबाब नोंदवले असून दीर्घ चौकशीनंतर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सापाच्या विषाच्या खरेदी-विक्रीप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला अटक केली होती, त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याआधी, हरियाणवी गायक राहुल यादव उर्फ ​​राहुल फाजिलपुरिया आणि एल्विश यादव यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घकाळ चौकशी केली होती.

एल्विश-फाजिलपुरिया यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला
इल्विश यादवने गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर निधी वापरण्यासाठी राहुल फाजिलपुरिया यांची मदत घेतल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने एल्विश यादव विरुद्ध रेव्ह पार्टी प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता, जिथे सापाचे विष देण्यात आले होते.