---Advertisement---
मुंबई : कारवाई करीत आणि अंमलबजावणी संचालनालयाने दहशतवाद निधी प्रकरणात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) (ईडी) ठाणे जिल्हयातील पडघा येथे महाराष्ट्र गुरुवारी छापेमारी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भिवंडीतील पडघा परिसरात गुरुवारी पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पडघ्यातील बोरिवली गावात यापूर्वी एटीएसने राबवलेल्या मोहिमेच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. काही संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली तसेच संशयास्पद व्यवहारांबाबत ईडीने चौकशी केली. या कारवाईत एटीएसने ईडीला सहकार्य केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या वर्षी जूनमध्ये ग्रामीण पोलिसांची मदत घेत एटीएसने बोरिवली आणि पडघा येथे २२ जणांवर छापेमारी केली होती. यात सिमीचा माजी पदाधिकारी साकिब नाचन आणि या प्रतिबंधित संघटनेचे काही इतर सदस्य तसेच समर्थकांचा समावेश होता.
त्या कारवाईत एटीएसने १९ मोबाईल आणि कट्टरवादाशी संबंधित दस्तावेज जप्त केले होते. दहशतवादाशी संबंधित कारवायांच्या मुद्यावर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली होती.









