---Advertisement---

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; खाद्यतेलाच्या दरात किलोमागे ‘एवढी’ वाढ

---Advertisement---

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता खाद्यतेलाच्या नव्या दरवाढीचा तडाखा बसत आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरी तेलाच्या किमतींमध्ये प्रति किलो पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, हॉटेल तसेच रस्त्यावरील स्टॉलवरील पदार्थांसह वडापाव, भजी, डोसे आदी खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. मात्र, शेंगदाणा तेलाचे दर सध्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

कशामुळे झाली खाद्यतेलाच्या किमतीत वाढ?
उत्पादन घटले:
या वर्षी सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत आवक कमी झाली आहे.

हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…


हमीभाव वाढ : केंद्र आणि राज्य सरकारने सोयाबीन व इतर पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला लाभ झाला असला तरी, बाजारात दर वाढण्याचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे.

आयात शुल्क : केंद्र सरकारने खाद्यतेलांवर २०% आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे आयात केलेल्या तेलाची किंमत वाढली असून, याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील दरांवर झाला आहे.

मागणी आणि पुरवठा : खाद्यतेलाची मागणी कायम असल्याने पुरवठ्यातील तफावत वाढली आहे. त्यामुळे बाजारात दर वाढत आहेत.

दोन वर्षांपूर्वीही झाली होती दरवाढ
दोन वर्षांपूर्वीही खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. त्यावेळी सरकारने इतर देशांतून पामतेल आणि इतर तेल आयात करून दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यंदा सोयाबीनच्या हमीभावात वाढ झाल्याने सरकारने तेच धोरण पुन्हा राबवण्याची शक्यता कमी आहे.

सध्याचे बाजारभाव (प्रति किलो)
सोयाबीन तेल: ₹१३५ ते ₹१४०
सूर्यफूल तेल: ₹१५५ ते ₹१६०
शेंगदाणा तेल: ₹१६० ते ₹१९५
मोहरी तेल: ₹१७० ते ₹१७५

खाद्यतेल महागल्यामुळे घरोघरी बजेट कोलमडले असून, रोजच्या स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. तसेच, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेतेही किंमती वाढवण्याच्या तयारीत असल्याने बाहेर खाणेही महागणार आहे. ग्राहकांनी सध्या तेलाच्या किंमतींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment