प्रवाशांना दिलासा : आठ रद्द रेल्वेगाड्या पूर्ववत धावणार

चार गाड्या नियमित मार्गाने धावणार : शॉर्ट टर्मिनेशनही रेल्वेकडून रद्द

भुसावळ मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेण्यात आल्याने काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात आले होते मात्र रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

या गाड्या पूर्ववत धावणार

गाडी क्रमांक २२२२३ मुंबई- साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस २९ व ३० रोजी धावेल तर गाड़ी क्रमांक २२२२४ साई नगर शिर्डी- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस २९ व ३० रोजी धावेल. गाडी क्रमांक २२९४७ दादर-साईनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस शुक्रवार, २८ रोजी धावणार आहे तर गाडी क्रमांक २२१४८
साईनगर शिडी-दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २९ जून २०२४ रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक १२१३१ दादर-साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २९ जून २०२४ रोजी धावेल तर गाडी क्रमांक १२१३२ साईनगर शिर्डी-दादर त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस ३० जून २०२४ रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक ११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (व्हाया पुणे) २९ रोजी तसेच गाडी क्रमांक ११०४२ साईनगर शिर्डी -दादर एक्सप्रेस ३० रोजी धावेल.

या गाड्या नियमित मार्गाने धावणार

गाडी क्रमांक १७६२९ पुणे-नांदेड एक्सप्रेस २८ व २९ रोजी आपल्या नियमित मागनि धावणार आहे. गाडी क्रमांक १७६३० नांदेड-पुणे एक्स्प्रेस २९ ते ३० जून २०२४ पर्यंत रोजी आपल्या नियमित मागनि धावणार आहे. गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस २७ व २८ जून २०२४ रोजी आपल्या नियमित मागनि धावेल आणि पुण्याला जाणार आहे. गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस २८ आणि २९ जून २०२४ रोजी आपल्या नियमित मागनि धावणार आहे.

चार रेल्वे गाड्या निर्धारीत ठिकाणी पोहोचणार

गाडी क्रमांक १७००२ सिकंदराबाद-साईनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस २८ जून २०२४ रोजी साईनगर शिर्डी येथे जाईल तर गाडी क्रमांक १७००१ साईनगर शिर्डी-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस २९ जून २०२४ रोजी साईनगर शिर्डी येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी क्रमांक २०८५७ अप पुरी-साईनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २८ जून २०२४ रोजी साईनगर शिर्डीला पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक २०८५८ डाऊन साईनगर शिर्डी-पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस ३० जून २०२४ रोजी साईनगर शिर्डी आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.