नंदुरबार : त्रिकोणी बिल्डींग कुरेशी मोहल्ला परिसरात अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने आठ गोवंश जनावरे डांबून ठेवलेले होते. पोलिसांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिकोणी बिल्डींग कुरेशी मोहल्ला परिसरात अवैधरित्या परिसरात अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने आठ गोवंश जनावरे डांबून ठेवलेले आहेत, अशी गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली. त्यानुसार एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार विभाग संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व पोलीस ठाणे स्टाफ अशांनी शहरातील त्रिकोणी बिल्डींग कुरेशी मोहल्ला भागातील आरोपी नामे शेख इरफान शेख सलीम पटेल (कुरेशी), रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार याचे ताब्यातील पत्र्याचे शेडमध्ये एकूण 08 गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने व त्यांची बेकायदेशीर वाहतुक करणेसाठी निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. त्याअन्वये सदर आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 239/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5(ए), 5(बी), 9 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत 55 हजार रुपये किमतीची एकुण 08 गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.