चोपडा : थील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची क्रेडिट ग्रामीण ऍक्सेस बँक मध्ये ट्रेनिंग मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये’ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून आठ विद्यार्थ्यांची ट्रेनिंग मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड यांनी कंपनी विषयीची तसेच कंपनीच्या नियम व अटी याविषयी सविस्तर माहिती दिली. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक जळगावचे संचालक राजू पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक जळगावचे संचालक राजू पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड तसेच समिती सदस्य डॉ.एम.एल.भुसारे, डी.डी.कर्दपवार आदी उपस्थित होते.
यांची निवड
राहुल राजेंद्र धनगर, महेश अशोक कोळी, अजय अमर अहिरे, लोकेश नरेंद्र बाविस्कर, भूषण किशोर शिंपी, रोहित राजेंद्र सोनवणे, शुभम हिरालाल धनगर, प्रशांत पवार यांचा समावेश आहे. सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना धुळे येथे ट्रेनिंगसाठी पाठविण्यात येणार आहे.