8th Pay Commission : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. एकूणच आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सरकारी कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांवर सकारात्मक परिणाम होणार आहेत.
हा आयोग कधी लागू होणार ?
८व्या वेतन आयोगाचा गठन २०२६ पर्यंत होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. यापूर्वीच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या गेल्याचे त्यांनी पुष्टी केली. हे निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.