---Advertisement---

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका, वाचा काय म्हणाले…

---Advertisement---

Eknath Shinde :  राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी माझ्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना दिली. तसेच अडीच वर्षांत महायुतीने केलेली कामे, यामुळेच  महायुतीचा विजय झाल्याचे मतदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मुख्यंमत्रीपदाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेतून बंड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आम्हाला पूर्ण पाठबळ दिले आणि ताकदीने आमच्या मागे उभे राहिले.

मुख्यंमत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री भाजपाचाच होणार, अर्थात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकाला सरकार म्हणून काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात प्रचंड काम केले. निवडणुकीच्या काळात दोन-तीन तासच झोपत असे. या काळात ८०-९० प्रचार सभा घेतल्यासेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यंमत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment