Eknath Shinde : मनधरणी यशस्वी, शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

#image_title

मुंबई । भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही ? याबद्दल अद्याप स्पष्टता नव्हती. पण आता यावर एकनाथ शिंदे यांनी  निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
शिवसेना आमदारांनी केलेली मनधरणी यशस्वी झाली असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाणार असून, शिंदेंच्या मंत्रिपदाचा सस्पेन्स संपला आहे.

मंत्रिमंडळ विस्तार
मुंबईच्या आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. तर, येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.