मुंबई । राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर आता मंत्रिमंडळच्या विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागली आहे. अशातच शिवसेनेला महायुतीमध्ये 13 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार : 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
शिवसेनेला नगरविकास खाते : शिंदे गटाच्या वाट्याला नगरविकास खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
13 मंत्रिपदं निश्चित : शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत.
महत्त्वाचे नेते :
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल
दरम्यान, 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. या विस्तारात शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदांसाठी बरेच दिवस भाजपला ताटकळत ठेवले होते, त्याचाच फायदा म्हणून शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रिपदं येणार असल्याची माहिती आहे.