---Advertisement---

Crime News: धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधलं,चटके दिले अन्…

by team

---Advertisement---

मेळघाट: मेळघाटातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना 30 डिसेंबरची असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच काल 17 तारखेला समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली. तेव्हा या वृद्धेवर शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. सुरुवातीला तिला लोखंडी सळई गरम करून चटके देण्यात आले. मिरचीची धुरीही दिली आणि तोंडाला काळं फासलं. ७७ वर्षीय महिलेवर इतक्या अत्याचारानंतरही गावकरी शांत बसले नाहीत. त्यांनी तिची गावातून धिंड काढली.

गावाचा पोलिस पाटील देखील सहभागी

या वृद्ध महिलेला अगावकऱ्यानी गरम सळाखीचे चटके दिले, मिरचीची धुरी दिली. तोंडाला काळे फासले एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही, तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडे देऊन तिला मारहाण करत धिंड काढून तिला गावातून बेदखल केले. विशेष म्हणजे यात गावाचा पोलिस पाटील देखील सहभागी झाला होता

पिडीत कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांत तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---