जळगाव : शेंदुर्णी सहकारी खरेदी-विक्री जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, मतदान २३ तारखेला होणार आहे. संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी तब्बल ३२ उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
ही निवडणूक जलसंपदामंत्री गिरीश महाजन व संजय गरुड यांच्या पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे दिलीप खोडपे, डिगंबर पाटील व आघाडी पॅनल यांच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.
मतदारसंघनिहाय उमेदवार
सर्वसाधारण व्यक्तीशः मतदारसंघ (१० जागा)
योगेश बनकर, ईश्वर चौधरी, मोतीलाल बारी, सुकलाल बारी, अंबरीश गरुड, अरुण घोलप, कैलास पाटील, प्रद्युम्न पाटील, प्रभाकर पाटील, गोपाळ गरुड, विजय गुजर, राजेंद्र पवार, डिगंबर पाटील, दगडू पाटील, प्रफुल्ल पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, विजय पाटील, विनोद पाटील, युवराज पाटील, प्रताप राजपूत.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
सर्वसाधारण संस्था मतदारसंघ (१ जागा)
भागवत पाटील, शोएब पटेल.
इतर मागासवर्ग (१ जागा)
सीताराम पाटील, समाधान पाटील.
महिला राखीव (२ जागा)
वंदना चौधरी, छाया पाटील, वंदना पाटील.
अनुसूचित जाती-जमाती (१ जागा)
गोविंदा निकम, प्रल्हाद पाटील.
विमुक्त जाती भटक्या जमाती व विमाप्र (१ जागा)
भास्कर पाटील, शामराव साबळे.
कडवी लढत होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीनंतर सहकार क्षेत्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन समर्थित पॅनलला कपबशी चिन्ह, तर खोडपे यांच्या पॅनलला छत्री चिन्ह देण्यात आले आहे. यामध्ये संजय दगडू पाटील हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत.
या निवडणुकीचा निकाल स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे मतदार आणि उमेदवार दोघेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.