राज्य सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एक एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपात करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. महावितरण कंपनीने सादर केलेल्या या प्रस्तावावर सुणावणी झाल्यावर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने 2025-26 या वर्षासाठी वीज दरात कपातीचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे वीज दरात 10 टक्के कपात झाली आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मिळणार आहे. नवे वीज दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून वीज मागणीत वाढ झाली आहे. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे.